२००९ फेब्रुवारी सुलाखेचा फोने आला .थोडे सुलाखे बदद्ल .सुलाखे पुण्यात प्रभात रोडला आयुष्य काढुनही पुणेकर पणा अंगाला चिकटवून न घेतलेला बार्शीकर .बोलणे समोरच्याचे अंगावर यावे असे मोकळे ढाकळे .१९९६ साली skf housing च्या कामावर मला "NDT" टेस्ट करता डायल गेज हवे होते .सुलाखे " युटायील इक्विपमेंट" नावाखाली "लाबोरेटरी सर्वे कंस्ट्रक्शन इक्विपमेंट " चा एक व्यावसायिक . मोकळ्या खिश्यामुळे त्याचे व माझा मित्र उदयचे नाते मी शोधले .परीस्थिती स्पष्ट पणे सांगतली ... बाहेर पडलो ते हातात हवे होते ते गेज घेऊन .भोरला १९९८ ला नीरा देवघरच्या काठ रस्त्याचे सर्वेचे काम घेतले तेंव्हा सुलाखेने सोकीयाची ऑटो लेवल सहकार नगरला एस टी कॉ लनी तील घरपोच दिली .किमत किती तुकड्यात मी दिली ते सां गाणेही अवघड .संबंध व्यावहारीक पातळीवर न राहता मैत्रीत बदलले .
सुलाखेच्या, आसाम मधे काम करणार का ? या प्रश्नावर दुसरया दिवशी दुपारी चारला नळस्टोप जवळील सागर ला त्याच्यासमोरील दोघांना भेटायचे ठरले .आमची भेट झाली व तिसऱ्या दिवशी मी मुंबई गौहाटी किंगफिशरच्या फ्लाइट ला होतो .
मध्य आसाम मध्ये एका सिमेंट कारखान्याच्या उभारणीचे काम आहे .तेंव्हा आसाम मधील असंतोष जोरात होता .दररोज कुठे ना कुठे बॉम्ब फुटत होते . काम मिळवण्यासा पात्रतेसाठी पूर्वानुभव बाजूला राहून नीडर पणे काम करण्याची मानसिक ताकतीमुळे मधे बांधकामाशी कधीही संपर्क न आलेले महाराष्ट्रातील काहीजण हा प्रकल्प मिळवण्यात यशस्वी झाले होते .त्यांचे पाठीशी ३५ वर्षापूर्वी आसामी झालेली मुळचे नागपूर कर रमेशजी होते .
लोकप्रिय गोपीनाथ बार्डोलाई विमान तळावर रमेशजी व मानव आम्हाला घ्यायला आले होते .लक्षात राहिले मानवाचे मोकळे हसणे जे आपण कधीच विसरलो आहोत .मानव नौगावाचा म्हणजे आसामी हे पटवून घ्यायला मला पुढे सहा महिने लागले .विमान तळाजवळील स्विकार ला आलु जीरा व रोटी खाल्ली व ३ वाजताची ट्रेन पकडून होजाई गाठली .रेल्वेची वाट पाहताना माझ्याबरोबर असलेल्या पी एम कुलकर्णीने त्याच्या मागील ट्रीपच्या वेळी ट्रेन सुटल्यानंतर अर्ध्या तासां नंतर फलाटावर झालेल्या स्फोटाची माहिती सहजपणे दिली त्यावेळी .चेहऱयावर जरी काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मी आतून खरेतर हादारलो होतो . हा धक्का मी गाडी सुरु झाली अन मी कधी विसरलो ते कळलेही नाही .व आसाम मधील पुढील दोन तीन फेऱ्या नंतर बॉ म्ब स्फोटां बाबत मीही तितक्याच सहजतेने बोलू लागलो .दररोजचे दुखणे दुखणे रहात नाही व तो जीवनाचा एक सहज भाग होतो हे त्यातून गेलेल्याला कळते पोटभर जेवणा नंतर बोलणे व अनुभवणे यात फार मोठा फरक असतो हे पुढील दिड वर्षात मी शिकलो .
हा माझा प्रवास मी पूर्णवेळ दारात उभे राहून केला .रामायण महाभारताच्या सिरियल्स मधील आश्रमाचे सेट्स रस्त्याच्या दुतर्फा उभे होते .बांबूची भिंती व गवताचे व नळीच्या पत्राचे छप्पर .भोवताली हिरवेगार सपाटी जवळच छोटेशे पाण तळे .होजाई ला भुबू आला होता .भूबुचे खरे नाव बभ्रुवाहन .आसामातील मणीपुरी ..आता थांबतो ..उद्या भेटू .

No comments:
Post a Comment