Wednesday, September 5, 2012

फेरफटका

सकाळी आवरुन चहा व नाश्ता घेण्यास टपरीवर आलो.  थोड्या  वेळाने एक दोन जण सहजच विचारपुस करुन गेले. आम्ही कोण कुठुन आलो आहोत कश्यासाठी आलो आहोत इ. पोटात घास पोहचण्यापुर्वीच हे लोक कोण आहेत व आपली माहिती घेतली गेलीय किंबहुना आम्ही येण्यापुर्वीच काही गोळा करण्यात आली होती.. हे आम्हाला कळुन चुकले अर्थात त्याचा फायदा असा काही नव्हता.


ईस्ट वेस्ट प्रोजेक्ट्स कॅलकॉम सिमेंट करीता  लंकाजवळ असलेल्या पिपलपुखरी या ठिकाणी  फॅक्टरीचे बांधकाम सुरु करणार होते. पुखरी म्हणजे छोटेसे तळे घराच्या परसदारीचे  जवळचे.

गावाची माहीती कराण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्याच्या दुतर्फा छान टुमदार घरे होती.लाकडाचा मुबलक वापर.उतरते छप्पर.भिंती बांबुच्या व त्यावर गिलावा मातीचा किंवा जरा सुबत्ता आहे तेथे सिमेंट चा का कॉंक्रीटचा ह्याचा पत्ता लागत नव्हता. पुण्याच्या तुलनेत वाहनसंख्या व असलेला वाहतुकीचा वोल्युम पाहता रस्त्य्यांची अवस्था बरी म्हणावी अशी.गावाच्या मधे एक रामाचे मंदीर जवळ भाजी  मंडई धान्याची बाजारपेठ.लोहारकाम,कुंभारकाम,न्हावी अशी बलुतेदारांची दुकाने. एक थिएटर.बाहेर  " झाल मुडी" ची गाडी.
माझे लहानपण चौथीपर्यंत खेड्यात व त्यानंतर जिलब्यामारुती समोर मंडई जवळ गेलेय. आणी  नकळत
मला पुर्वीच्या मिनर्व्हा ते बाबुगेनु चौकाचा परीसरात घेवुन गेला.


 " झाल मुडी" आपल्या भेळेची ही बहीण. मुरमुर्‍यांमधे चिंचेच्या पाण्याएवजी सरसोच्या तेलाचा वापर.बाकी घटक तेच बटाटा कांदा टोमॅटो,मिठ मसाला व चवीला लोणचे.हे कागदाच्या द्रोणात एकत्र करुन गिर्‍हाईकाला दिले जाते. रेल्वेमधे झालमुडी विकणारे  फ़िरस्ते वा कलकत्त्याच्या डमडम विमानतळाबाहेर विकणारा झालमुडीवाला मला "अनंतपुर- कर्नुल" या आन्ध्रच्या रायलसिमा भागात मिळणार्‍या उगानी (त्या बरोबर च्या अख्ख्या मिरचीच्या भजाची),झटकन चटकन पटकन केलेल्या तेल तिखट मीठ लावलेल्या चुरमुर्‍यांची किंवा मराठवाडा लातुर भागातल्या सुशला ची दरवेळी आठवण करुन द्यायचा.भारतात वैविध्यता तर आहेच पण गंमत अशी की त्यात साधर्म्य ही सापडते.














   

Monday, September 3, 2012

किलकिली होत आहेत मनाची कवाडं..

किलकिली होत आहेत मनाची कवाडं..   

लंका पत्रीचा पहिला दिवस

   आम्हाला बुभूने मयूरला सोडले .ईस्टवेस्ट प्रोजेक्ट्सच्या  अजय पाटणकर, समीर, पोतदार याची येथे भेट झाली .हॉटेल मयूरच्या बाहेर एक छोटीशी टपरी .आसाम मधे कित्येक पिढया ज्यांनी घालवल्या अश्या शीख बाबाची .माझ्या भटकंती च्या वेडामुळे कितीएक वर्षां पूर्वी सह्याद्रीमित्राच्या काळात एखाद्या ठिकाणी गेलो असता तिथली माहिती नकळत बोलतांना मिळवण्याची सवय मला आहे . बाबाची सून घरून डाळ रोटी भाजी करून पाठवते व हे अन्न गरम करून टपरीत ते व त्यांच्या सौ देत होत्या .जेवणानंतर  कलाकंद सम जो पदार्थ  तोंड गोड करण्यास पाटणकरांनी मागवला होता . बाबांचा मुलगा काय करतो वर पाटणकर गेल्या दीड वर्षापूर्वी त्याला उल्फाने खण्डणी पोटी उचलले आहे व अजून पर्यंत त्याचा काही एक अतापता नाही असे कालाकांद तोंडात टाकता टाकता सहजतेने सांगितले व जेवताना का बोलू नये हे मला  मिळालेल्या उत्तरामुळे कायमचे लक्षात राहिले ,तेही गोड खाता खाता.

२००५-६ मधे  गोरखपुर च्या वारीनंतर आपल्या येथे "अपहरण" सेट प्रत्यक्षात असतात त्यात कुठेही कल्पना वगैरे  नसतात हे पुन्हा पटले .दु:ख्ख  नेहमीच क्षणिक असते व काळाच्या ओघात ते नुसते हलके न होता विरते हे पक्के पटले .

 सकाळी पुणे मुंबई कारने ,त्यानंतर विमान,रेल्वे,पुन्हा रोड ने असे दरमजल करत करत आम्ही मुक्कामी पोहचलो होतो .जलप्रवास काय तो राहिला होता . गादी वर पाठ टेकली केंव्हा व झोप लागली केंव्हा हे कळलेही नाही .स्वप्नात लांकापात्रीच्या वाटेवर ब्रम्हपुत्रा पहिली ,बोटीने प्रवास सुरु केला  अचानक  धक्क्का बसला ,बोट डळमळली  मला काय करावे हे कळेना .डोळे उघडले तेंव्हा कळले प्रत्यक्षात तो येथे नेहमीप्रमाणे होणारया भूकंपाचा एक छोटासा धक्क्का होता.




Sunday, September 2, 2012

अहोम आसोम आसाम

२००९ फेब्रुवारी सुलाखेचा फोने आला .थोडे सुलाखे बदद्ल .सुलाखे पुण्यात प्रभात रोडला  आयुष्य काढुनही पुणेकर पणा अंगाला चिकटवून  न घेतलेला बार्शीकर .बोलणे समोरच्याचे  अंगावर यावे असे मोकळे ढाकळे .१९९६ साली skf  housing च्या कामावर मला "NDT" टेस्ट करता डायल गेज हवे होते .सुलाखे " युटायील इक्विपमेंट" नावाखाली  "लाबोरेटरी सर्वे कंस्ट्रक्शन इक्विपमेंट " चा एक   व्यावसायिक . मोकळ्या खिश्यामुळे त्याचे व  माझा मित्र उदयचे नाते मी शोधले .परीस्थिती स्पष्ट पणे सांगतली ... बाहेर पडलो ते हातात हवे होते ते गेज घेऊन .भोरला १९९८ ला नीरा देवघरच्या काठ रस्त्याचे सर्वेचे काम घेतले तेंव्हा सुलाखेने सोकीयाची ऑटो लेवल सहकार नगरला  एस  टी  कॉ लनी तील घरपोच दिली .किमत किती तुकड्यात मी दिली ते सां गाणेही अवघड .संबंध व्यावहारीक पातळीवर न राहता मैत्रीत बदलले .
सुलाखेच्या,  आसाम मधे काम करणार का ? या प्रश्नावर दुसरया दिवशी दुपारी चारला नळस्टोप जवळील सागर ला  त्याच्यासमोरील दोघांना भेटायचे ठरले .आमची भेट झाली व तिसऱ्या दिवशी मी मुंबई गौहाटी किंगफिशरच्या फ्लाइट ला होतो .
मध्य आसाम मध्ये एका सिमेंट कारखान्याच्या उभारणीचे काम आहे .तेंव्हा आसाम मधील असंतोष जोरात होता .दररोज कुठे ना कुठे बॉम्ब  फुटत होते . काम मिळवण्यासा पात्रतेसाठी पूर्वानुभव बाजूला राहून नीडर पणे काम करण्याची मानसिक ताकतीमुळे मधे बांधकामाशी कधीही संपर्क न आलेले  महाराष्ट्रातील काहीजण हा प्रकल्प मिळवण्यात यशस्वी झाले होते .त्यांचे पाठीशी ३५ वर्षापूर्वी आसामी झालेली मुळचे  नागपूर कर रमेशजी होते .
लोकप्रिय गोपीनाथ बार्डोलाई विमान तळावर रमेशजी व मानव आम्हाला घ्यायला आले होते .लक्षात राहिले मानवाचे मोकळे हसणे जे आपण कधीच विसरलो आहोत .मानव नौगावाचा म्हणजे आसामी हे पटवून घ्यायला मला पुढे सहा महिने लागले .विमान तळाजवळील स्विकार ला आलु जीरा व रोटी खाल्ली व ३ वाजताची ट्रेन पकडून होजाई गाठली .रेल्वेची वाट पाहताना माझ्याबरोबर असलेल्या पी एम कुलकर्णीने त्याच्या मागील ट्रीपच्या वेळी ट्रेन सुटल्यानंतर अर्ध्या तासां नंतर फलाटावर झालेल्या स्फोटाची माहिती सहजपणे दिली त्यावेळी .चेहऱयावर जरी काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मी आतून खरेतर हादारलो होतो . हा धक्का मी गाडी सुरु झाली अन मी कधी विसरलो ते कळलेही नाही .व आसाम मधील पुढील दोन तीन फेऱ्या नंतर बॉ म्ब स्फोटां बाबत मीही तितक्याच सहजतेने बोलू लागलो .दररोजचे दुखणे दुखणे रहात नाही व तो जीवनाचा एक सहज भाग होतो हे त्यातून गेलेल्याला कळते पोटभर जेवणा नंतर बोलणे व अनुभवणे यात फार मोठा फरक असतो हे पुढील दिड वर्षात मी शिकलो . 

हा माझा प्रवास मी पूर्णवेळ दारात उभे राहून केला .रामायण महाभारताच्या सिरियल्स मधील आश्रमाचे सेट्स रस्त्याच्या दुतर्फा उभे होते .बांबूची भिंती व गवताचे व नळीच्या पत्राचे छप्पर .भोवताली हिरवेगार सपाटी जवळच छोटेशे पाण तळे .होजाई ला  भुबू आला होता .भूबुचे खरे नाव बभ्रुवाहन .आसामातील मणीपुरी ..आता थांबतो ..उद्या भेटू .

  

Saturday, September 1, 2012

अग्रलेख : शुक्रशुचिता

आजच्या लोकसत्ता मध्ये आलेला हा लेख .काहींनी वाचला असेलही .हा बाकी सर्वां साठी .कॅथोलिक नसलेल्या प्रॉटेस्टंट ब्रिटन मधे हा प्रश्न केला जातो .उद्या आपल्याकडे  हि कदाचित ...... 
अग्रलेख : शुक्रशुचिता

Friday, August 31, 2012

प्रशांत ,

मी लिहिताना भरकटलोय .जयपूर मध्ये टी .व्ही .वर बातमी एकली IBN वर चर्चा पाहतांना मी २८ वर्षे मागे गेलो .त्यामधे पिगसास मधेच आले एवढेच  .मी ह्यात साधर्म्य दाखवतो आहे हे लक्षातही आले नाही .व्यवसायाच्या अनुषंगा ने  मी लोकांना दारू पाजत आलो आहे व हे चालणार आहे .आत्ता सुद्धा "मोवेत"ची महागडी वाईन बेड रुमच्या एका कोपऱ्यात एलिजिबल ब्युरोक्रटची  वाट पहात आहे .मी  लिहिताना लार्जर दयान लाइफ मॉड मधे गेलो .कुठेतरी चुकतंय पण काय व कसे याचा शोध घेतोय .

माझा एक अनुभवलेले पण गंमतीचे  निरीक्षण मी इथे सांगू इच्छितो . ..बरयाच बरबटलेल्या अधिकाऱ्यांची मुले अतिशय सच्छील सरळ नाकासमोर चालणारी स्वत:च्या जीवावर चांगल्या अमेरिकन विद्यापीठात प्रवेश मिळवणारी आहेत .घरात येणारा पैसा कुठल्या मार्गाने येतोय किती प्रमाणात येतोय  ह्याला अपवाद असणारी .व या उलट आपल्यासारख्या पांढ र पेश्या घरात IIT पास आउट पालकांची मुले शिक्षणात रेंगाळणारी काळात न काळात व्यसनांच्या अधिना जाणारी  .कुठेतरी हे थांबवणे गरजेचे आहे हे मनापासून वाटतेय 
आपण आपल्याशी किती प्रामाणिक आहोत याला महत्व आहे त्यामुळेच या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय ..

 आपल्या पार्ट्या , व्रत, वडीलधाऱ्यांचा उपमर्द वा अपमान , संस्कार या पद्धतीने विचार करणे ह्या पलीकडे जाणे  आता गरजेचे आहे . समाजाचा एक भाग व्रते उद्यापने  करणारा ऋषी-मुनी संस्कारांना महत्व देणारा व त्यातील एक पीढी अश्या पद्धतीने समोर येतीय हे त्रासदायक .
बर जाताजाता सांगतो मला दीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पैकी एक पुण्यातील प्रथितयश सर्जन आहे दुसरा न्युयोर्कमध्ये सर्जन आहे,शिक्षण व समाजातील स्थान या पलीकडे जाऊन पाहणे गरजेचे आहे . 

Thursday, August 30, 2012

मी माझ्या अपघातानंतर दिवाळी २००२ पासुन पिगासस ला पोहायला जातोय . माझे आसामचे काम सुरु झाले व त्यात खंड पडला .परंतु हया १० वर्षात "एकमेका पाहू पाण्यात "  हा एक छान ग्रुप मात्र तयार झाला .आठवले काका दोन वर्षांपुर्वी फेब्रुवारी २०१० ला गेले .  मी पुण्याला आलो कि सकाळी तलावावर सर्वानां भेटायला असतो .महिन्यात येणारे वाढदिवस जवळील एका तारखेस  आम्ही सर्वजण मिळुन साजरे करतो . वयोगट ३४ ते ८० .बहुतेक सर्वजण  स्वतःच्या  उद्योग धंद्यात वा व्यवसायात .बाहेर हॉटेल मधे त्यानिमित्त वारंवार जाणारे .अप्रुप नसलेले .भेटणे महत्वाचे खाणे नाही ह्यातील .माझ्यासारखे न घेणारे असताना खाण्याबरोबर पिणेही होतेच .आमच्या पैकी बहुतेक एकाचेही काका मामा वा बाकी वडिलधरया नी कधीही  दारूला स्पर्श ही केला नसेल किंबहूना ह्या विचाराने सुध्दा त्यांना घेरी आली असती .मग हे का होत आहे? खोटी सामाजिक प्रतिष्ठा , युरोप अमेरिकेतील समाज जीवनाचे अनुकरण .कष्ट, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन,श्रमाची प्रतिष्ठा यांना बगळा देवुन नाकोती गोष्ट आपण अंगिकारत आहोत .आपली संस्कृती ही सण साजरे करून ,व्रते उद्यापने करून नाही टिकत .ती आतुन रहावी लागते हे खरे .पोट भरल्यावर दिवान खान्यात गप्पा मारणे सोपे आहे .मुल्ये रुजवणे कठीण आहे .     

Wednesday, August 29, 2012

आज सकाळ मधील मुलांच्या पार्टीची बातमी वाचताना ८५ साल फर्गसन कॉलेजमधील इन्सिक आठवले .आमचा वैशालीचा ग्रुप -नवीन वर्षाची पहाट।समोर सिगारेटचे पाकीट,बीअरची बाटली व दीक्षा प्रदान करण्यास पुढे सरसावलेले मित्रगण .एकाची आई शाळेत मुख्याध्यापिका एकाचे वडील कारखानदार -तर आजीची प्राथमिक शाळा .रहायला शनिपार मंडई ,बाणेर रोडला।ज्यांच्या मागील कित्येक पिढी मध्ये हा विचार ही मनास हि शिवला नव्हता .आणी आत्ता ...मी मागे सरकलो व व्यसनातन अडकता सुटलो .खोट्या कल्पना फ़िल्मी विचार त्यातील हिरोंच्या अंधानुकरणात अडकलेली ह्या कोवळ्या वयातील मुले .तोच सापळा २७ वर्षानंतरही .तेंव्हा क्रेझ चा पगडा होता आता समाजात प्रतिष्ठा पावलेल्या व त्या मुळे खुणावणारे व सावजास खेचाणारे सापळे . कस  परावृत्त करायचे ह्या कोवळयान्या हा  विचार करण्यास प्रवृत्त करणारे .