सकाळी आवरुन चहा व नाश्ता घेण्यास टपरीवर आलो. थोड्या वेळाने एक दोन जण सहजच विचारपुस करुन गेले. आम्ही कोण कुठुन आलो आहोत कश्यासाठी आलो आहोत इ. पोटात घास पोहचण्यापुर्वीच हे लोक कोण आहेत व आपली माहिती घेतली गेलीय किंबहुना आम्ही येण्यापुर्वीच काही गोळा करण्यात आली होती.. हे आम्हाला कळुन चुकले अर्थात त्याचा फायदा असा काही नव्हता.
ईस्ट वेस्ट प्रोजेक्ट्स कॅलकॉम सिमेंट करीता लंकाजवळ असलेल्या पिपलपुखरी या ठिकाणी फॅक्टरीचे बांधकाम सुरु करणार होते. पुखरी म्हणजे छोटेसे तळे घराच्या परसदारीचे जवळचे.
गावाची माहीती कराण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्याच्या दुतर्फा छान टुमदार घरे होती.लाकडाचा मुबलक वापर.उतरते छप्पर.भिंती बांबुच्या व त्यावर गिलावा मातीचा किंवा जरा सुबत्ता आहे तेथे सिमेंट चा का कॉंक्रीटचा ह्याचा पत्ता लागत नव्हता. पुण्याच्या तुलनेत वाहनसंख्या व असलेला वाहतुकीचा वोल्युम पाहता रस्त्य्यांची अवस्था बरी म्हणावी अशी.गावाच्या मधे एक रामाचे मंदीर जवळ भाजी मंडई धान्याची बाजारपेठ.लोहारकाम,कुंभारकाम,न्हावी अशी बलुतेदारांची दुकाने. एक थिएटर.बाहेर " झाल मुडी" ची गाडी.
माझे लहानपण चौथीपर्यंत खेड्यात व त्यानंतर जिलब्यामारुती समोर मंडई जवळ गेलेय. आणी नकळत
मला पुर्वीच्या मिनर्व्हा ते बाबुगेनु चौकाचा परीसरात घेवुन गेला.
" झाल मुडी" आपल्या भेळेची ही बहीण. मुरमुर्यांमधे चिंचेच्या पाण्याएवजी सरसोच्या तेलाचा वापर.बाकी घटक तेच बटाटा कांदा टोमॅटो,मिठ मसाला व चवीला लोणचे.हे कागदाच्या द्रोणात एकत्र करुन गिर्हाईकाला दिले जाते. रेल्वेमधे झालमुडी विकणारे फ़िरस्ते वा कलकत्त्याच्या डमडम विमानतळाबाहेर विकणारा झालमुडीवाला मला "अनंतपुर- कर्नुल" या आन्ध्रच्या रायलसिमा भागात मिळणार्या उगानी (त्या बरोबर च्या अख्ख्या मिरचीच्या भजाची),झटकन चटकन पटकन केलेल्या तेल तिखट मीठ लावलेल्या चुरमुर्यांची किंवा मराठवाडा लातुर भागातल्या सुशला ची दरवेळी आठवण करुन द्यायचा.भारतात वैविध्यता तर आहेच पण गंमत अशी की त्यात साधर्म्य ही सापडते.