Friday, August 31, 2012

प्रशांत ,

मी लिहिताना भरकटलोय .जयपूर मध्ये टी .व्ही .वर बातमी एकली IBN वर चर्चा पाहतांना मी २८ वर्षे मागे गेलो .त्यामधे पिगसास मधेच आले एवढेच  .मी ह्यात साधर्म्य दाखवतो आहे हे लक्षातही आले नाही .व्यवसायाच्या अनुषंगा ने  मी लोकांना दारू पाजत आलो आहे व हे चालणार आहे .आत्ता सुद्धा "मोवेत"ची महागडी वाईन बेड रुमच्या एका कोपऱ्यात एलिजिबल ब्युरोक्रटची  वाट पहात आहे .मी  लिहिताना लार्जर दयान लाइफ मॉड मधे गेलो .कुठेतरी चुकतंय पण काय व कसे याचा शोध घेतोय .

माझा एक अनुभवलेले पण गंमतीचे  निरीक्षण मी इथे सांगू इच्छितो . ..बरयाच बरबटलेल्या अधिकाऱ्यांची मुले अतिशय सच्छील सरळ नाकासमोर चालणारी स्वत:च्या जीवावर चांगल्या अमेरिकन विद्यापीठात प्रवेश मिळवणारी आहेत .घरात येणारा पैसा कुठल्या मार्गाने येतोय किती प्रमाणात येतोय  ह्याला अपवाद असणारी .व या उलट आपल्यासारख्या पांढ र पेश्या घरात IIT पास आउट पालकांची मुले शिक्षणात रेंगाळणारी काळात न काळात व्यसनांच्या अधिना जाणारी  .कुठेतरी हे थांबवणे गरजेचे आहे हे मनापासून वाटतेय 
आपण आपल्याशी किती प्रामाणिक आहोत याला महत्व आहे त्यामुळेच या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय ..

 आपल्या पार्ट्या , व्रत, वडीलधाऱ्यांचा उपमर्द वा अपमान , संस्कार या पद्धतीने विचार करणे ह्या पलीकडे जाणे  आता गरजेचे आहे . समाजाचा एक भाग व्रते उद्यापने  करणारा ऋषी-मुनी संस्कारांना महत्व देणारा व त्यातील एक पीढी अश्या पद्धतीने समोर येतीय हे त्रासदायक .
बर जाताजाता सांगतो मला दीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पैकी एक पुण्यातील प्रथितयश सर्जन आहे दुसरा न्युयोर्कमध्ये सर्जन आहे,शिक्षण व समाजातील स्थान या पलीकडे जाऊन पाहणे गरजेचे आहे . 

Thursday, August 30, 2012

मी माझ्या अपघातानंतर दिवाळी २००२ पासुन पिगासस ला पोहायला जातोय . माझे आसामचे काम सुरु झाले व त्यात खंड पडला .परंतु हया १० वर्षात "एकमेका पाहू पाण्यात "  हा एक छान ग्रुप मात्र तयार झाला .आठवले काका दोन वर्षांपुर्वी फेब्रुवारी २०१० ला गेले .  मी पुण्याला आलो कि सकाळी तलावावर सर्वानां भेटायला असतो .महिन्यात येणारे वाढदिवस जवळील एका तारखेस  आम्ही सर्वजण मिळुन साजरे करतो . वयोगट ३४ ते ८० .बहुतेक सर्वजण  स्वतःच्या  उद्योग धंद्यात वा व्यवसायात .बाहेर हॉटेल मधे त्यानिमित्त वारंवार जाणारे .अप्रुप नसलेले .भेटणे महत्वाचे खाणे नाही ह्यातील .माझ्यासारखे न घेणारे असताना खाण्याबरोबर पिणेही होतेच .आमच्या पैकी बहुतेक एकाचेही काका मामा वा बाकी वडिलधरया नी कधीही  दारूला स्पर्श ही केला नसेल किंबहूना ह्या विचाराने सुध्दा त्यांना घेरी आली असती .मग हे का होत आहे? खोटी सामाजिक प्रतिष्ठा , युरोप अमेरिकेतील समाज जीवनाचे अनुकरण .कष्ट, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन,श्रमाची प्रतिष्ठा यांना बगळा देवुन नाकोती गोष्ट आपण अंगिकारत आहोत .आपली संस्कृती ही सण साजरे करून ,व्रते उद्यापने करून नाही टिकत .ती आतुन रहावी लागते हे खरे .पोट भरल्यावर दिवान खान्यात गप्पा मारणे सोपे आहे .मुल्ये रुजवणे कठीण आहे .     

Wednesday, August 29, 2012

आज सकाळ मधील मुलांच्या पार्टीची बातमी वाचताना ८५ साल फर्गसन कॉलेजमधील इन्सिक आठवले .आमचा वैशालीचा ग्रुप -नवीन वर्षाची पहाट।समोर सिगारेटचे पाकीट,बीअरची बाटली व दीक्षा प्रदान करण्यास पुढे सरसावलेले मित्रगण .एकाची आई शाळेत मुख्याध्यापिका एकाचे वडील कारखानदार -तर आजीची प्राथमिक शाळा .रहायला शनिपार मंडई ,बाणेर रोडला।ज्यांच्या मागील कित्येक पिढी मध्ये हा विचार ही मनास हि शिवला नव्हता .आणी आत्ता ...मी मागे सरकलो व व्यसनातन अडकता सुटलो .खोट्या कल्पना फ़िल्मी विचार त्यातील हिरोंच्या अंधानुकरणात अडकलेली ह्या कोवळ्या वयातील मुले .तोच सापळा २७ वर्षानंतरही .तेंव्हा क्रेझ चा पगडा होता आता समाजात प्रतिष्ठा पावलेल्या व त्या मुळे खुणावणारे व सावजास खेचाणारे सापळे . कस  परावृत्त करायचे ह्या कोवळयान्या हा  विचार करण्यास प्रवृत्त करणारे .