Monday, September 3, 2012

लंका पत्रीचा पहिला दिवस

   आम्हाला बुभूने मयूरला सोडले .ईस्टवेस्ट प्रोजेक्ट्सच्या  अजय पाटणकर, समीर, पोतदार याची येथे भेट झाली .हॉटेल मयूरच्या बाहेर एक छोटीशी टपरी .आसाम मधे कित्येक पिढया ज्यांनी घालवल्या अश्या शीख बाबाची .माझ्या भटकंती च्या वेडामुळे कितीएक वर्षां पूर्वी सह्याद्रीमित्राच्या काळात एखाद्या ठिकाणी गेलो असता तिथली माहिती नकळत बोलतांना मिळवण्याची सवय मला आहे . बाबाची सून घरून डाळ रोटी भाजी करून पाठवते व हे अन्न गरम करून टपरीत ते व त्यांच्या सौ देत होत्या .जेवणानंतर  कलाकंद सम जो पदार्थ  तोंड गोड करण्यास पाटणकरांनी मागवला होता . बाबांचा मुलगा काय करतो वर पाटणकर गेल्या दीड वर्षापूर्वी त्याला उल्फाने खण्डणी पोटी उचलले आहे व अजून पर्यंत त्याचा काही एक अतापता नाही असे कालाकांद तोंडात टाकता टाकता सहजतेने सांगितले व जेवताना का बोलू नये हे मला  मिळालेल्या उत्तरामुळे कायमचे लक्षात राहिले ,तेही गोड खाता खाता.

२००५-६ मधे  गोरखपुर च्या वारीनंतर आपल्या येथे "अपहरण" सेट प्रत्यक्षात असतात त्यात कुठेही कल्पना वगैरे  नसतात हे पुन्हा पटले .दु:ख्ख  नेहमीच क्षणिक असते व काळाच्या ओघात ते नुसते हलके न होता विरते हे पक्के पटले .

 सकाळी पुणे मुंबई कारने ,त्यानंतर विमान,रेल्वे,पुन्हा रोड ने असे दरमजल करत करत आम्ही मुक्कामी पोहचलो होतो .जलप्रवास काय तो राहिला होता . गादी वर पाठ टेकली केंव्हा व झोप लागली केंव्हा हे कळलेही नाही .स्वप्नात लांकापात्रीच्या वाटेवर ब्रम्हपुत्रा पहिली ,बोटीने प्रवास सुरु केला  अचानक  धक्क्का बसला ,बोट डळमळली  मला काय करावे हे कळेना .डोळे उघडले तेंव्हा कळले प्रत्यक्षात तो येथे नेहमीप्रमाणे होणारया भूकंपाचा एक छोटासा धक्क्का होता.




1 comment:

Unknown said...

saheb, apan bhari lihit ahat. nakkich asa lihit ahat ki ata pudhe kay honar ashi utsukata watate ahe. Keep it up. madhech band karu naka.

nitin kabnurkar.